नंदिग्राम एक्प्रेसवर दगडफेक?

Foto

औरंगाबाद : नागपूर-मुंबई नंदिग्राम एक्सप्रेसवर दौलताबाद-औरंगाबाद दरम्यान रेल्वेची चैन ओढून चोराने दगडफेक झाल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. चोरी करणार्‍या चोराला रेल्वे लोहमार्ग पोलिसाने ताब्यात घेतअले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र दगडफेक केली की नाही हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

यापूर्वीही काकीनाडा एक्सप्रेसवर अंकाई दरम्यान दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून लाखो रुपयांचा माल प्रवाशांकडून लुटला होता. त्यातील दरोडेखोरांचाही पोलिसांना शोध लागला नाही. याशिवाय आधीदेखील रेल्वेवर दगडफेक झाल्याची घटना समोर आल्या असताना याकडे गांभीर्याने कुणीही पाहिलेेले दिसत नाही. आता काल रात्री पुन्हा नागपूर-मुंबई नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये एका चोराने चोरी करुन दौतलाबाद-औरंगाबाद दरम्यान एक्सप्रेसची चैन ओढून दगडफेक केल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे. मात्र दगडफेक झाली की नाही? याविषयी रेल्वे पोलिसांनाही याविषयी माहिती नाही. त्यामुळे दगडफेकीची घटना गुलदस्त्यातच आहे. यामुळे पुन्हा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

चोरास केले रेल्वे पोलिसांनी अटक
नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये आरोपी सिकंदर खान (रा. शहानूरवाडी, औरंगाबाद) यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 10 हजार रुपयांचा चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. आरोपीविरुद्ध रेल्वे पोलीस ठाणे अमलदार धनराज गडलिंगे यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सुमीत आठवले यांच्या फिर्यादीनुसार चोरास अटक केली आहे. मात्र दगडफेकीविषयी कुठलीही माहिती रेल्वे पोलिसांकडे आलेली नसल्याचे रेल्वे पोलीस निरीक्षक दिलीप साबळे यांनी स्पष्ट केले.  या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विजय बोराडे हे करीत आहेत.